ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झालीये. अशातच पाकिस्तानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय. पाकिस्तानने धमकी दिली त्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी नेता मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येतंय.
या पार्श्वभूमीवर, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानकडून आलेल्या या ईमेलमध्ये आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून देऊ, असं लिहिलंय. या धमकीनंतर सुरक्षा एजन्सींनी तपास सुरू केलाय आणि अहमदाबादमधील स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनला पाकिस्तानकडून हा धमकीचा मेल आलाय. याबाबत जीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्टेडियमच्या सुरक्षा रक्षकांना याबद्दल सतर्क करण्यात आलंय. सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कतेने काम सुरू ठेवलंय. गुजरात पोलिस आणि सायबर क्राईम टीमकडून ईमेलच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे.