खळबळजनक ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला बेड्या ; चौकशी सुरू
खळबळजनक ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला बेड्या ; चौकशी सुरू
img
DB
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी राजस्थानातून आली आहे. जैसलमेर पोलिसांनी एक सरकार कर्मचारी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा माजी पीएला अटक केली आहे. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय साठी काम करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group