साई मंदिरात फुलं, हार नेण्यावर बंदी , मंदिर प्रशासनाचा निर्णय ; नेमकं काय कारण?
साई मंदिरात फुलं, हार नेण्यावर बंदी , मंदिर प्रशासनाचा निर्णय ; नेमकं काय कारण?
img
Dipali Ghadwaje
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करीत दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले आहेत. त्यानंतर पाकिस्ताननेही कुरापती करीत भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारताने सडेतोड उत्तर देत हे हल्ले परतवून लावले आहेत.

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या शिर्डीमधील साईबाबा मंदिरात हार, फुले, प्रसाद नेण्यावर भाविकांना बंदी घालण्यात आलीयं. मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलायं.

काही दिवसांपूर्वीच शिर्डीच साई बाबा मंदिर उडवून देण्याच्या आलेला ई मेलच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी साई मंदीराला भेटत देत सुरक्षेचा आढावा घेतला. याचबरोबरीने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. 

दरम्यान या बैठकीनंतर भारत-पाकिस्तान मधील तणाव निवळेपर्यत रविवारपासून (11 मे) साई मंदीरात हार, फुले, प्रसाद आणि मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती, साई संस्थानकडून देण्यात आली आहे.

 महाराष्ट्र पोलीस, QRT, MSF, अशा विविध सुरक्षा एजन्सीचे तब्बल 1 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक साई मंदिराची सुरक्षा पाहत आहे. कोरोना काळात साई मंदिरात फुले, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी न्यायालयान लढून ही बंदी उठवली होती. आता भारत पाकिस्तान पार्श्वभूमीवर पुन्हा हार, फुले प्रसाद, साई मंदिरात नेण्यास बंदी घालण्यात येणार असल्यानं पुन्हा एकदा हार, प्रसाद व्यवसायिकांना याचा फटका बसणार आहे.
 
 
 
  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group