मंदिर बॉम्बने उडवून देऊ, शिर्डीच्या साई संस्थानला पुन्हा धमकी
मंदिर बॉम्बने उडवून देऊ, शिर्डीच्या साई संस्थानला पुन्हा धमकी
img
Vaishnavi Sangale
शिर्डीच्या साई संस्थान लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात. साई संस्थान हे एक नावाजलेले धार्मिक ठिकाण आहे. मात्र या संस्थानला वारंवार धमक्या येण्याचे प्रकार सुरु आहेत. 

आता पुन्हा एकदा एक धमकीचा मेल साई संस्थानला आला आहे. मंदिर बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणारा मेल भगवंत मान ऍट द रेट यांडेक्स डॉट कॉम या ई मेल आयडीवरुन आला आहे. अज्ञात व्यक्तीने हे मेल पाठवले असून त्यात मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. या धमकीने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिर्डीच्या साई संस्थानने पोलिसांना माहिती दिली. पोलीस सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ई मेल करणाऱ्याचा शोध सुरु आहेत. यापूर्वीही धमक्या देणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई रेल्वे स्फोट; हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, जेलबाहेर आलेल्या आरोपींचं काय?
इतर बातम्या
Join Whatsapp Group