बनावट वेबसाईटपासून सावध व्हा ! साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट बनवून भाविकांची फसवणुक
बनावट वेबसाईटपासून सावध व्हा ! साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट बनवून भाविकांची फसवणुक
img
वैष्णवी सांगळे
काही दिवसांपूर्वी शनी शिंगणापूर येथे बनावट वेबसाईटचे प्रकरण उघडकीस आले होते. आता पुन्हा एकदा शिर्डी साईसंस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचे धक्कदायक वृत्त समोर आले आहे. या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

धक्कादायक ! आई म्हणाली अभ्यास कर , रागाच्या भरात मुलीने मात्र भलतंच केलं

साई दर्शनासाठी शिर्डीत वर्षाकाठी लाखो भाविक येतात. इथे निवासाला थांबायचे असल्याचे असुविधा टाळण्यासाठी भाविक शक्यतो साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन रूम बुकिंग करतात. मात्र याचाच गैरफायदा काही अपप्रवृत्तींनी घेतला असून साईसंस्थान भक्तनिवासाच्या नावाने बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचे समोर आले आहेत. 

सीबीआयकडून नाशिकमध्ये दोन बेकायदेशीर कॉल सेंटर्स उध्वस्त
 
साईसंस्थानची अधिकृत वेबसाई समजून एका व्यक्तीने रूम बुकिंगसाठी विचारणा केली असता त्याला व्हॉट्सॲपवर एक स्कॅनर आले. त्यावर पेमेंट केल्यानंतर संबंधिताने तुम्ही भक्त निवासाच्या काउंटरवर आल्यावर पावती देतो असे सांगितले. मात्र ज्यावेळी जाधव कुटुंब शिर्डीत साई संस्थानच्या भक्तनिवासात पोहचले, तेव्हा आपल्या नावे बुकिंगच नसल्याचे समजले. गोंधळलेल्या जाधव यांना साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी धीर देत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर साईभक्तांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group