तुळजापूर ड्रग्ज प्रकरण :  ''या'' खासदाराच्या अडचणीत वाढ, आरोपीसोबतचे फोटो व्हायरल
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण : ''या'' खासदाराच्या अडचणीत वाढ, आरोपीसोबतचे फोटो व्हायरल
img
दैनिक भ्रमर
राज्यातील घडामोडींना वेग आला  आहे.  तुळजापूर नगरीतील 'ड्रग्ज' प्रकरण गेल्या एक-दीड वर्षापासून चांगलेच रंगत आहे. दरम्यान,आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुळजापूर  ड्रग्ज प्रकरणामुळे आता खासदार ओमराजे निंबाळकर ही अडचणीत आले आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबतचे ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

काही दिवसांपूर्वा पोलिसांनी तुळजापूरात एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणात काही जणांना रंगेहाथ पकडलं होतं. तुळजापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राहुल परमेश्वर व सुमित शिंदे फोटो व्हायरल झाले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून सोशल मीडियावर खासदार ओमराजे निंबाळकर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी यांचे फोटो व्हायरल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर फोटो शेअर करत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ड्रग्ज प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा पाटील यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं होतं. फोटो व्हायरल होताच कार्यकर्ता कुठलाही, कोणाच्याही जवळचा असू द्या त्याला पाठीशी न घालता कार्यवाही करा अशी मागणी केली आहे. खासदारांच्या जवळचे कार्यकर्ते आरोपी असल्यामुळे पोलीस काय कारवाई करतात या कडे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या खात्यात पोलिसांना मोठं घबाड सापडलं आहे. पोलिसांनी आरोपीचं बँक खातं गोठावलं आहे. तसेच पोलिसांनी आरोपीकडून पाव किलो सोनंही जप्त केलं आहे. दरम्यान, आरोपीच्या खात्यावर जे पाच कोटींचे व्यवहार झाले, ते व्यवहार नेमके कुठून झाले, याचा स्त्रोत नक्की काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group