अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या गाडीचा अपघात ! कारला बेस्ट बसचा धक्का
अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या गाडीचा अपघात ! कारला बेस्ट बसचा धक्का
img
दैनिक भ्रमर
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या हिच्या कारचा अपघात झाला असल्याची बातमी समोर आली आहे.  ऐश्वर्या हिच्या कारला बेस्ट बसचा धक्का लागला असल्याची  माहिती आहे. . बुधवारी दुपारी ऐश्वर्याच्या जुहू येथील निवासस्थानाजवळ ही घटना घडली. या अपघातात कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झाले नाही. ऐश्वर्या रायच्या सिल्वर वेलफायर या गाडीला हा धक्का लागला. 

दरम्यान, बसचा धक्का लागला तेव्हा गाडीत कोण होते, त्यासंदर्भातील माहिती अजून समोर आली नाही. याबाबत अधिकृत माहिती ऐश्वर्या राय बच्चन हिच्या टिमकडून देण्यात येणार आहे. दरम्यान, या अपघातासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका कारला बसने धडक दिल्याचे दिसून येते. ही कार ऐश्वर्या राय बच्चनची असल्याचा दावा केला जात आहे. बेस्टची बस त्या कारला धडकली. धडक झाल्यानंतर कार घटनास्थळावरुन निघाली. या अपघातात कारचेही काहीच नुकसान झाले नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group