तुम्हालाही पासपोर्ट साठी अर्ज ककरायचा आहे ,तर हि महत्वाची माहिती तुमच्या साठी आहे. पुढील पाच दिवस पासपोर्ट साठी अर्ज करता येणार नाही कारण पुढील पाच दिवस पासपोर्ट ऑनलाईन पोर्टलची सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात नव्या अपॉइमेंट्स दिल्या जाणार नाहीत. तसंच, आधी दिलेल्या अपाइमेंट्स रद्द करून त्यांना पुढच्या तारखा दिल्या जाणार आहेत.
या विषयी सविस्तर माहिती अशी कि , तांत्रिक कामांसाठी २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार आहे. या काळात हे पोर्टल नागरिकांसाठी आण MEA/RPO/BOI/ISP/DoP/Police Authorities यांच्यासाठी बंद राहणार आहे. ३० ऑगस्टसाठी दिलेली अपाइमेंट पुढे ढकलण्यात येईल आणि अर्जदारांना यासंदर्भात कळवण्यातयेईल, असं पासपोर्ट सेवा पोर्टलकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच , ही नियमित चालणारी प्रक्रिया असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “अपॉइंटमेंट्सच्या तारखा बदलण्यासाठी आम्ही आधीच योजना आखून ठेवलेली असते. नागरी सेवासंदर्भातील सेवा खंडित करण्याआधी पूर्वनियोजन केलं जातं. त्यामुळे अपॉइंटमेंट्स रिशेड्युल करणं फारसं आव्हानात्मक नसेल”, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.