काय सांगता ? लग्नात विदाईच्या वेळी नवरी रडली नाहीतर चक्क तिला मारतात , कुठे आहे ही अजब प्रथा ?
काय सांगता ? लग्नात विदाईच्या वेळी नवरी रडली नाहीतर चक्क तिला मारतात , कुठे आहे ही अजब प्रथा ?
img
दैनिक भ्रमर

विविध देशांमध्ये लग्नाबाबतच्या प्रथा-परंपरा भिन्न आहे. लग्नात विदाईच्या वेळी नवरी आपल्या आई वडीलांपासून दूर जात असताना तिला तिचा भावना अनावर होतात आणि बिचारी रडू लागते. आणि हे स्वाभाविकही आहे . शेवटी इथे भावनांचा प्रश्न असतो. पण काही नवऱ्या मुलींना रडू येत नाही. पण एक देश असा आहे, जिथे लग्नाच्या एक महिना आधीपासूनच मुलीला रडण्याचा सराव करावा लागतो. आणि लग्नात जर नवरी मुलगी रडली नाहीतर तिला चक्क मारहाण करण्याची प्रथा आहे . जेणेकरून ती रडेल. 

चीन देशात लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. चीनमधल्या एका प्रांतात नवऱ्या मुलीला लग्नावेळी रडावं लागतं. तिला रडू आलं नाही, तर मारहाणही केली जाते. चीनच्या नैऋत्य दिशेला असलेल्या सिचुआन प्रांतात तूजिया जमातीचे लोक गेल्या हजारो वर्षांपासून राहत आहेत. त्या जमातीत लग्नाबाबत एक विचित्र प्रथा पाळली जाते. 

नववधूला रडू आलं नाही, तर गावात ती चेष्टेचा विषय बनते. गावातले लोक तिला त्या कुटुंबातली वाईट पिढी मानतात. काही ठिकाणी तर जर मुलीला रडू आलं नाही, तर तिची आई रडू येण्यासाठी तिला मारतेदेखील. चीनच्याच आणखी एका प्रांतात तर नववधूसह इतर स्त्रियांनीदेखील रडण्याची पद्धत आहे. चीनच्या पश्चिम प्रांतातल्या या पद्धतीला ‘जुओ टांग’ असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ असतो, हॉलमध्ये बसणं. लग्नाच्या एक महिना आधीच्या रात्री नववधू एखाद्या मोठ्या हॉलमध्ये जाते व जवळपास एक तास रडते. त्यानंतर दहा दिवसांनी तिची आईही तिच्यासोबत रडू लागते. आणखी दहा दिवसांनी आज्या, आत्या, मावशा अशा सगळ्या नातलग महिला त्यात सहभागी होतात. त्या रडत असताना तिथे गाणं-बजावणं सुरू होतं. त्या गाण्यावरही त्या रडतात. त्यालाच ‘क्राइंग मॅरेज साँग’ असं म्हटलं जातं. लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या असतातच; पण चीनमधली ही पद्धत अनोखी आहे. 

एका वेबसाइटनं दिलेल्या रिपोर्टनुसार, १७ व्या शतकात ही परंपरा खूप कटाक्षानं पाळली जात होती. १९११ मध्ये क्विंग साम्राज्यापर्यंत या प्रथेचं पालन केलं गेलं. बदलत्या काळानुसार ही प्रथा हळूहळू बदलते आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परंपरा ख्रिस्तपूर्व ४७५ ते ख्रिस्तपूर्व २२१ या दरम्यान सुरू झाली असावी. तेव्हा जाओ प्रांतातल्या राजकुमारीचं लग्न यैन प्रांतात झालं होतं. तेव्हा राजकुमारीच्या पाठवणीवेळी तिची आई खूप रडली होती. तसंच लवकर घरी परत ये, असं तिनं मुलीला सांगितलं होतं. लग्नामध्ये रडण्याबाबतची ती पहिली घटना समजली जाते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group