पेठ तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्याविरोधात संविधान हक्क परिषदेच्या महिला आक्रमक;
पेठ तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्याविरोधात संविधान हक्क परिषदेच्या महिला आक्रमक; "या" मागण्यांचे दिले निवेदन
img
दैनिक भ्रमर
पेठ : - पेठ तालुक्यातील लिंगवणे,भायगाव, आड बु. शिंदे,भोकरीपाडा,कोहर,आड खु.,पाटे ,करंजाळी तालुक्यातील आदी भागात अवैध मद्य विक्रेत्यांनी उच्छांद मांडला आहे. या अवैध दारू विक्रेतांचा पेठ पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पेठ तालुका संविधान हक्क परिषदेच्या महिलांनी निवेदना द्वारे केली आहे.

पेठ तालुक्यातील या भागात अवैध दारू विक्रेते वाढले असुन मोलमजुरी करणा-या कुटुंबातील पुरूष मंडळी व्यसनाच्या आहारी जावुन कुटुंब कलह वाढला असून अनेक कुटुंब अडचणीत आले असून त्यांच्या व्यसनाधीनतेला व अवैध दारू विक्री करणाऱ्यांना कटांळुन या भागातील महिलांनी ग्रामपंचायतींच्या ग्राम सभेवरही दारूबंदी बाबत ठराव घेतले असुन कारवाई  होत नसल्याने सर्व महिला एकत्र येत पेठ पोलीस  ठाण्यात याबाबतचे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

 यावेळी संविधान हक्क परिषदेचे अध्यक्ष भास्कर हाडस जनार्दन तुंबडे उपाध्यक्ष सुमन फसाळे, रंजना गवळी , कमल भोये ,अश्विनी कोटमे, लता टोपले ,सोपान पवार आदींसह तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
इतर बातम्या
Join Whatsapp Group