क्रूरतेचा कळस !  सतत भुंकतात म्हणून कुत्र्यांना  विषारी औषध देऊन केले ठार , 25 कुत्र्यांचा मृत्यू,  कुठे घडली घटना ?
क्रूरतेचा कळस ! सतत भुंकतात म्हणून कुत्र्यांना विषारी औषध देऊन केले ठार , 25 कुत्र्यांचा मृत्यू, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
अकोला शहरातून एक धक्कादायक अन विश्वास न बसणारी घटना समोर आली आहे. मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडून एका इसमाने अक्षरशः क्रूरतेचाही कळस पार केला असल्याची ही  घटना घडली हे . या माणसाने कुत्रे सतत भुंकतात म्हणून विषारी औषध देऊन या कुत्र्यांना ठार मारले आहे. 

यात तब्बल २५ हून अधिक कुत्र्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्राणी प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या मृत श्वानांमध्ये मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहराला लागून असलेल्या गुडधी भागात ही धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जात असताना मोकाट कुत्रे आपल्या अंगावर भुंकतात. या क्षुल्लक कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने या मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध दिले. विषारी अन्न खाल्ल्याने २४ तासांच्या आत तब्बल २५ हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला, तर काही कुत्र्‍यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त केला. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group