प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु असून या कुंभमेळ्यात देशभरातून करोडोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दरम्यान, कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठा आणि खबळजनक
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत. कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासनही वाहने लपवायला विसरले असतील, असे आंबेडकर म्हणाले.
प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. परंतु, त्यादिवशी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत शासनाने सांगितल्यापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंबेडकर करीत आहेत.
मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या उत्तर प्रदेश प्रशासनाने खोटी सांगितली आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेले हे सर्वात मोठे कव्हर-अप आहे. मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी, योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृतदेह हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले आहे, असे गंभीर आरोप ॲड. आंबेडकर यांनी केले आहेत.
तसेच, एखाद्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करणे किती महत्त्वाचे आहे, हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी खोटे बोलून आणि हिंदू विधी न पाळता त्यांचे मृतदेह भट्टीत जाळून १००० हून अधिक हिंदू भाविकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना फसवले असल्याचेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.