बीडमध्ये मराठा आरक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत पोलिसांनी 66 गुन्हे दाखल केले आहेत. तर 160 आरोपींना अटक केलीय. या घटनेत जवळपास 2 हजार जणांची चौकशी केली असून साडेपाचशे आरोपींची ओळख पटली आहे. त्यांचा देखील शोध सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आहे.
या प्रकरणाचे पोलिसांना 200 हून अधिक व्हिडिओ प्राप्त झालले असून यातून आरोपींचा शोध घेतला जातोय. तर विशेष 8 पथके या प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेत कोणत्याही आरोपीला जातपात नसून त्यांना अटक केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तर या दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई आरोपींकडूनच केली जाणार आहे.