दुसरे लग्न करण्यासाठी पोटच्या एक वर्षाच्या चिमुकल्याची साडे तीन लाख रुपयांना विक्री
दुसरे लग्न करण्यासाठी पोटच्या एक वर्षाच्या चिमुकल्याची साडे तीन लाख रुपयांना विक्री
img
दैनिक भ्रमर


बीड (भ्रमर वृत्तसेवा) :- शहरात एक वर्षाच्या चिमुकल्याची साडे तीन लाख रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

पतीने सोडून दिलेल्या 20 वर्षीय महिलेला दुसर्‍या लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एका वर्षांच्या मुलाला गोवा राज्यात साडे तीन लाख रुपयांना विक्री करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. तर, विक्री केलेले बाळ सुखरूप असून, त्याला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पिंकीचे (नाव बदलेले) एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यातून, तिने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती समजताच पतीने तिला सोडून दिले. त्यामुळे पिंकी मागील काही दिवसांपासून आईकडे म्हणजेच माजलगावला राहत होती.

या काळात माजलगावातील ओळखीची असणार्‍या छायाच्या घरी पिंकीचे येणेजाणे सुरु झाले. विशेष म्हणजे याचवेळी किशोर भोजने नावाचा व्यक्तीची पत्नीही नांदत नसल्याने तो देखील अधूनमधून छायाकडे येत होता.

यावेळी त्याची पिंकीसोबत ओळख झाली आणि त्याने तिच्या 1 वर्षांच्या मुलाला आपले नाव दिले. दरम्यान, यावेळी छायाने पिंकीला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखविले होते, तर तिचे मूल कोल्हापुरातील ललिता नावाच्या महिलेच्या मदतीने विक्री करण्याचा प्लॅन आखला. विशेष म्हणजे ललिता मुले विकण्याचा व्यवसाय करत होती.

त्यानुसार तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने ग्राहक शोधला आणि साडे तीन लाखात मुलाला विकले. मात्र, याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत बाळाची सुटका केली. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group