संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हटल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडनं पुण्यात आत्मसमर्पण केलंय. सीआयडीला कराड शरण गेल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलीय. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराडवर कलम ३०२ का नाही? असा सवालही उपस्थित केलाय. तसंच या प्रकरणात २-३ दिवसांपासून सेटींग सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
'वाल्मीक कराड हे शरण जातील हे आधीच ट्विटद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला मी माहिती दिली होती. कारण या प्रकरणी २-३ दिवसांपासून अंतर्गत सेटींग सुरू होतं. जेव्हा मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, तेव्हा त्यांच्यात काहीतरी सेटींग झालेली असते. तो स्वता: हून सरेंडर होत आहे, ही मोठी गोष्ट आहे. काही गोष्टी पुसायला लागतात, काही गोष्ट सांगायला लागतात, आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल, ते करताना या गोष्टी पाहाव्या लागतात. ' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
वाल्मीक कराड फिलोसोफरसारखं बोलतो. माझ्यावर खंडणीचा खोटा आरोप आहे, संतोष देशमुख हत्येशी संबंध नाही. असं कराड म्हणतो. तो मोठा फिलोसोफर आहे. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधीक टीका केलीय. वाल्मीक कराडवर कलम ३०२ का नाही? खंडणीच्या गुन्ह्यात घेतलंय. खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त ३ महिने. वाल्मीक कराडची जामीन तर होणारच असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.