आवाज खाली...  शहाणपण करू नका, रोहित पवारांना पोलीस ठाण्यात राग अनावर? नेमकं काय घडलं ?
आवाज खाली... शहाणपण करू नका, रोहित पवारांना पोलीस ठाण्यात राग अनावर? नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
गुरुवारी विधानभवन परिसरात चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. विधानभवन परिसरात झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले.या वादात पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचे पडसाद रात्रभर उमटले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरात अटक केली.

या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोन्ही आमदार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. एका पोलीस अधिकारी हातवारे करत रोहित पवार यांच्याशी बोलत होता. ते पाहून पवार संतापले. त्यांनी मोठ्या आवाजात त्या अधिकाऱ्याला सुनावले, “हातवारे करू नका… आवाज खाली ठेवा… शहाणपण करू नका… बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का?” या वेळी रोहित पवारांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनी “साहेबांना हात लावायचा नाही,” असा इशारा पोलिसांना दिला. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाडही तिथे उपस्थित होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group