अजित दादा सत्तेशिवाय...; रोहित पवारांचा हल्लाबोल
अजित दादा सत्तेशिवाय...; रोहित पवारांचा हल्लाबोल
img
दैनिक भ्रमर
अजित पवार (Ajit Pawar) सत्तेशिवाय राहू शकत नाही, 2019 पासूनच सुरू भाजपसोबत (BJP) जाण्याचं प्लॅनिंग होतं , असे म्हणत रोहित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही असा त्यांचा अलिखित नियम होता, असे देखील रोहित पवार (Rohit Pawar) या वेळी म्हणाले. ते इंदापुरात बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्धार 2019 मध्ये केला होता. हे मी नाही त्यांचे नातेवाईक सांगतात. मनात 2019 पासून साहेबांना सोडण्याचा प्लॅन करत होते. दादा सत्तेपासून दूर राहू शकत नाही. दादा आणि त्यांच्या सोबत गेलेले नेते सत्तेपासून दूर राहू शकत नाही. पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही असा अलिखित नियम होता, म्हणून आम्ही लक्ष देत नव्हतो.

भाजप नेते यांना धमक्या देतात, आम्ही फाईल बाहेर काढू: रोहित पवार

सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि शरद पवारांचे निकटवर्तीय प्रविण माने यांच्याविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रविण माने यांचा व्यवसाय आहे. शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रविण माने यांना मदत केली. त्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धमकी देत असतील त्याला ते घाबरले. इथल्या लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे. सुप्रिया सुळे निवडून येणार आहे. सगळे नेते का गेले आहेत आपल्याला माहीत आहे. भाजप नेते यांना धमक्या देत आहेत की आम्ही फाईल बाहेर काढू म्हणून. मोहिते कुटुंबातील लोकांनी परत यायचा निर्णय घेतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group