लाडकी बहीण योजनेबाबत अर्जातील ‘त्या’ गोष्टीवर रोहित पवारांचा आक्षेप, नेमकं काय कारण?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्जातील ‘त्या’ गोष्टीवर रोहित पवारांचा आक्षेप, नेमकं काय कारण?
img
Dipali Ghadwaje
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलैपासूनच या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला विविध तहसील कार्यालयात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र या योजनांचा लाभ मिळावा म्हणून गर्दी होत असातनाच अनेक अडचणी येताना दिसत आहेत. तसेच या मुद्यावरून विरोधकांनी सरकारलाही धारेवर धरलं आहे. त्यातच आता आणखी एका मुद्यावरून वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाराष्ट्र सरकारने या योजनाचा अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. पण त्या अर्जावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आदिती तटकरे यांचा फोटो आहे.  त्यावरूनच आता विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे.

‘ केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अर्जावर तिघांसह मोदींचे फोटो आहेत, असे फोटो लावता येत नाहीत’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी यावर आक्षेप दर्शवला आहे. योजनेचा वापर केवळ राजकीय लाभासाठी असेल तर आम्ही हे सहन करणार नाही, असे म्हत रोहित पवारांनी यावर टीका केली आहे.

राजकीय हेतूने आणली योजना

महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमागे राजकीय हेतू आहे. यातून कोणालाही मदत करण्याचा शासनाचा हेतू नाही तर फक्त राजकीय हेतू आहे. भाजपने केवळ दहा हजार कोटी या योजनेला दिले आहेत. केवळ आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या अर्जावर मुख्यमंत्र्यांसह, तिघांचे आणि नरेंद्र मोदींचे फोटो आहेत, मात्र असे फोटो लावता येत नाहीत, असे म्हणत रोहित पवार यांनी यावर आक्षेप नोंदवला. लोकसभेतील पराभवानंतर ही योजना आणली असा आरोप करत योजनेचा वापर केवळ राजकीय लाभासाठी असेल तर आम्ही हे सहन करणार नाही असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group