आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात युवा सेनेचे नाशिकमध्ये जोडे मारो आंदोलन
आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात युवा सेनेचे नाशिकमध्ये जोडे मारो आंदोलन
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला युवा सेनेच्या वतीने ‌‘जोडे मारो' आंदोलन करण्यात आले
आ. जितेंद्र आव्हाड यांनीही  महाड येथील चवदार तळ्यावर स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी एक आंदोलन केले.

याच आंदोलनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडून टाकला. कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तरीही आव्हाड थांबले नाहीत.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक युवासेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी युवासेना विस्तारक योगेश बेलदार, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, भा. वि. से. महानगरप्रमुख शुभम्‌‍ पाटील, भिवानंद काळे, सनी रोकडे, मिलिंद मोरे, ओम्‌‍कार चव्हाण, श्रावण पवार, सनी पगार, सुनील परदेशी, विकास पाथरे, आकाश कोकाटे, मनीष गांगुर्डे, बबलू मुर्तडक, अजय गरुड, राज सूर्यवंशी, ऋषिकेश पाठक, राज गायकवाड, विजय काची, प्रतीक तिवारी, कमलेश भाले, निखिल कापडणे आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group