विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवरआज जामखेडमध्ये रोहित पवार यांची सभा झाली. यावेळी रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठं विधान केलं आहे.
कोविड काळात आम्ही लोकांची सेवा केली आणि हे गाणी ऐकत होते. देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर फोडले. राम शिंदे यांना जिथे मत मिळाली तिथे देखील पाण्याचे टँकर दिले. लंपीचा रोग आला तेव्हा ते गायब झाले तेव्हा ते कुठल्या घरी गेले माहित नाही. पवारांची ताकद कमी नाही, फक्त फोन कोणासाठी करायचा हे महत्वाचे आम्ही कधी गुंडासाठी फोन नाही केला, असं रोहित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते रोहित पवारांना मतदार संघात अडकवून ठेवा मात्र त्यांना ते जमले नाही… तर लोकसभेला अमित शहा म्हणाले पवार साहेबांनी दहा वर्षात काय केले. तेव्हा लोकांनी त्यांना लोकशाही मार्गाने उत्तर देत 9 जागा दिल्या. आता ही तेच म्हणाले त्याच उत्तर त्यांना मिळेल.
आपलं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे. तर लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही.आपण एक लाख मतांनी निवडून येणार आहोत, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.