गंभीर आजारामुळे जिवाला धोका असल्याने ; वाल्मिक कराडने केली
गंभीर आजारामुळे जिवाला धोका असल्याने ; वाल्मिक कराडने केली "ही" मोठी मागणी
img
Dipali Ghadwaje
बीड : राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजत असून यामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सध्या सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कोठडीमध्ये कराडला खास सुविधा मिळत असल्याचा आरोप होत आहे. अशातच आता वाल्मिक कराडने आपल्याला गंभीर आजार असल्याचा दावा करत मदतनीस म्हणून खास व्यक्तीच्या नावाची शिफारस केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असून या आजारासाठी ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही  मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावा अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. यासंबंधी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

मशीन वापरण्यासाठी रोहीत कांबळेने प्रशिक्षण घेतले असून मशीन चुकीच्या पध्दतीने लावल्यास आपल्या जिवीतास धोका असल्याचा धक्कादायक दावा कराडने केला आहे.

त्यामुळे रोहीत कांबळेला आपल्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये विनंती वाल्मिक कराडने केली आहे. वाल्मिक कराडच्या या दाव्यावर न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group