सरपंचाच्या हत्येप्रकरणी शरद पवार गटाच्या
सरपंचाच्या हत्येप्रकरणी शरद पवार गटाच्या "या" नेत्यासह ५ जणांविरोधात गुन्हा
img
दैनिक भ्रमर

परळी (भ्रमर वृत्तसेवा) :- बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारामध्ये अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबार प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह अन्य चार जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक देवाण- घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बबन गीते यांनी मृत बापू आंधळे यांना बोलावून घेत पैसे आणलेस का? अशी विचारणा करत गोळीबार केल्याचे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.  दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या काही समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तसेच आक्षेपार्ह पोस्टमुळे काही शहरांमध्ये बंदही ठेवण्यात आला होता. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group