धक्कादायक घटना :
धक्कादायक घटना : "या" ठिकाणी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण ; मागितली २ कोटींची खंडणी
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका बिल्डरच्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. विशेष म्हणजे, खंडणीसाठी आलेला अपहरणकर्त्यांचा मोबाइल काही वेळाने बंद झाला. त्यानंतर सर्वजण चिंताग्रस्त झाले आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजता एन ४, सिडको भागात घडली. 

दरम्यान, अख्खे शहर पोलीस दल मुलाला शोधण्यासाठी रस्त्यावर उतरले. चौकाचौकात नाकाबंदी लावण्यात आली होती. चैतन्य असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तुपे हे नामांकित बिल्डर आहेत. मंगळवारी रात्री चैतन्य हा वडिलासोबत सायकल खेळत होता. वडील हे वॉकिंग करीत असताना तो काहीसा मागे राहिला. तेवढ्यात एक कार आली. कारच्या आतील आणि बाहेरील लाईट बंद होत्या. त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तेवढ्यात मुलगा कारमध्ये जाऊन बसला. 

त्यानंतर कार उच्च न्यायालयाच्या दिशेने पसार झाली. काही क्षणात हा प्रकार वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी धावाधाव केली मात्र, काहीही उपयोग झाला नाही. पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी तांत्रिक तपास सुरु केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group