धक्कादायक :
धक्कादायक : "या" ठिकाणी बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या , नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
नागपूरमध्ये  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास एका तरूणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मृत तरूण बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होता. २ दिवसांपूर्वी कामावर गेला. मात्र, तो काही घरी परतलाच नाही. तरूणाचा मृतदेह सापडल्यानंतर  या घटनेचा अधिक तपास  पारडी पोलीस घेत आहेत.

तपासादरम्यान त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ही घटना नागपूर येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतलं आहे. हत्येचं नेमकं कारण काय? याचा शोध पारडी पोलीस घेत आहेत.

सतीश मेश्राम (वय वर्ष ३१) असे मृत तरूणाचं नाव आहे. तो नागपुरातील भांडेवाडी परिसरातीस रहिवासी होता. तो बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होता. दोन दिवसांपूर्वी कामावर गेला मात्र घरी परतला नाही. सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शोधा शोध करून मिळून न आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

पारडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. शुक्रवारी रात्री भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना मृतदेह आढळून आला. तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तो मृतदेह सतीशचा असल्याचं निष्पन् झालं.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, सतीशची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group