....अन् नागपूरमध्ये विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले  , नक्की काय घडलं??
....अन् नागपूरमध्ये विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले , नक्की काय घडलं??
img
Dipali Ghadwaje
नागपूर : इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबई ते रांची विमानामध्ये प्रवास करत असतांना विमानातील एका प्रवाशाला रक्ताची उलटी झाल्याने हे विमानाचे सोमवारी (21 ऑगस्ट) रात्री आठ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर अचानक  लॅण्डिंग करण्यात आलं.त्यानंतर  प्रवाशाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या प्रवाशाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार . इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबई ते रांची विमान क्रमांक 6E 5093 मध्ये हा प्रकार घडला. विमान प्रवासादरम्यान देवानंद तिवारी यांना रक्ताची उलटी झाली. मुंबईहून रांचीला जाणाऱ्या प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. अखेरीस नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. परंतु उपचाराआधीच देवानंद तिवारी  यांचा मृत्यू झाला. 

देवानंद तिवारी यांना किडनीचा त्रास होता आणि त्यांना टीबी देखील होता. प्रवासादरम्यान त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. परिणामी विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं.

विमान नागपूरच्या विमानतळावर उतरण्यानंतर देवानंद तिवारी यांना पुढील उपचारांसाठी, विमानतळावर तैनात किम्स-किंग्सवे रुग्णालयाच्या अॅम्ब्युलन्समधून सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आला. डीजीएम (ब्रॅण्डिंग अँड कम्युनिकेशन्स) एजाज शमी यांनी ही माहिती दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group