भीषण अपघात : ५२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली ; कुठे घडली घटना?
भीषण अपघात : ५२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
नागपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. या बसमधून ५२ विद्यार्थी प्रवास करत होता. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढून रग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या देवळी पेंढरीनजीक ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली आहे. तब्बल ५२ विद्यार्थी या बसमधून प्रवास करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. या विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. 

कुठे घडली घटना?

नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये हा अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस घाटातील वळणावर उलटली. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीमध्ये पडली. ही बस सरस्वती विद्या मंदिर शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य केले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group