नागपूर : येथून नागपुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपुरातील पांढुरणा मार्गावरील भागे महिरी शिवारात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागपूरच्या महिरी शिवारात सोमवारी १० वाजता झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
या घटनेबाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पांढुरणा भागे येथील महिरी शिवारात सोमवारी १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. नागपुरात झालेल्या भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मेव्हण्याचा मृत्यू झाला आहे. ३८ वर्षीय शिवाजी परासराम शिरसाम, १० वर्षीय ललित शिवारी शिरसाम, २७ वर्षीय अनिल इवनाथ यांचा मृत्यू झाला आहे. अनिल इवनाथे हा शिवाजी शिरसामचा मेव्हणा आहे. ते आज केळवद शिवारात एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा कोटोलला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी खळबळ उडाली. अपघातानंतर स्थानिक मदतीला धावले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी रुग्णावाहिकेला बोलवून घेतले. त्यानंतर स्थानिकांनी तिघांना रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेले. स्थानिकांनी तिघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा केळवद पोलिसांनी शोध सुरु केला आहे. अपघातातील तिघांचे मृतदेह प्राथमिक केंद्रात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. तिघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.