आई की वैरीण! नुकत्याच जन्मलेल्या मुलीला आईने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, कुठे घडली खळबळजनक घटना?
आई की वैरीण! नुकत्याच जन्मलेल्या मुलीला आईने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, कुठे घडली खळबळजनक घटना?
img
Dipali Ghadwaje
एकीकडे मुलं होत नाही म्हणून बरेच जण नवस मागताना दिसतात. आईपासून मुलं क्षणभरासाठी जरी दूर गेलं तरी आईचा जीव कासावीस होतो. परंतु दुसरीकडे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या धंतोली परिसरात घडली आहे. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका निर्दयी आईने नुकत्याच जन्मलेल्या मुलीला फेकले. स्थानिक लोकांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 नागपूरच्या धंतोली परिसरातील गजानन नगर परिसरात घरकामासाठी जाणाऱ्या एका मोलकरणीला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्या आवाजाने महिलेने आजूबाजूस शोधाशोध केली असता तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नुकतीच जन्मलेली चिमुकली दिसली. या चिमुकलीला पाहून महिलेला धक्का बसला. तिने त्या मुलीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उचलून छातीशी कवटाळले आणि आजूबाजूच्या नागरिकांमध्ये विचारपूस केली. महिलेने घडलेल्या घटनेसंदर्भात धंतोली पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकलीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चिमुकलीची प्रकृती ठीक असून तिला सध्या वैद्यकीय देखरेखी खाली ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. धंतोली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून निर्दयी आईचा शोध घेतला जात आहे.

हा परिसर उच्चभ्रू असून येथे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल सुद्धा आहेत. गजबजलेल्या या परिसरात कोणत्या निर्दयी मातेने आपल्या मुलीला रस्त्यावर सोडले याचा पोलीस तपास करत आहेत. त्याचबरोबर नवजात बाळाला फेकण्यामागे काय कारण याहे याचाही शोध पोलीस घेत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group