अरे बापरे! पुन्हा एकदा भयंकर अपघात, भरधाव कारने 4 जणांना उडवलं
अरे बापरे! पुन्हा एकदा भयंकर अपघात, भरधाव कारने 4 जणांना उडवलं
img
Dipali Ghadwaje
नागपुरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यातच नागपुरात हिट अँड रनची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

नागपुरात हिट अँड रनची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील केडीके कॉलेज चौकात भरधाव कारने चार लोकांना उडवल्याची घटना घडली आहे. भरधाव कार टर्निंग घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली आहे. 

यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. गेल्या तीन आठवड्यात अपघाताची ही तिसरी घटना येथे घडली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे.

केडीके कॉलेज चौकात भाजीपाल्याच्या गादीवर काही लोक भाजी खरेदी करण्यासाठी आले असता एक भरधाव काराने भाजीपाल्याच्या गाडीला  जोरदार धडक दिली .या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली .या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांनी मिळाली नंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group