बसमध्ये बॉम्ब ; निनावी पत्राने 'या' बसस्थानकावर खळबळ
बसमध्ये बॉम्ब ; निनावी पत्राने 'या' बसस्थानकावर खळबळ
img
दैनिक भ्रमर
नागपूर एस.टी.स्थानकावर गोंदियातून आलेल्या बसमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे निनावी पत्र सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सापडल्याने स्थानकावर खळबळ उडाली. प्रशासनाने ही माहिती गणेश पेठ पोलिसांना देताच, त्यांनी बॉम्बशोध व नाशक पथकासह पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, तपासणी केली. दरम्यान काहीही न आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा श्‍वास घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नागपूर एसटी स्थानकावर गोंदिया आगारातून एमएच-३१-एन-८५०१ या क्रमांकाची बस आली. यावेळी ती परत जाण्यासाठी प्रवासी आत चढले. त्यावेळी एका प्रवाशाला एका सिटवर चिठ्ठी आढळली. त्यात एसटीमध्ये बॉम्ब फुटणार असल्याचे लिहिलले आढळले. त्याने ही चिठ्ठी चालकाला दिली. त्याने ही माहिती अधिकाऱ्यांना दिली.

मशाल चिन्हाच्या विरोधात 'हा' पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मछीद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वान पथकाने बसची तपासणी केली. मात्र, काही अाढळले नाही. परिसराचीही तपासणी केली. त्यानंतर बस रवाना करण्यात आली. यापूर्वी गडचिरोली आगारातून आलेल्या बसमध्ये एक टिफिन बॉम्ब असल्याचे आढळून आले होते. मात्र, तपासणीत ते फायर इस्टिंग्युशन असल्याचे समोर आले होते.
nagpur |
इतर बातम्या
Join Whatsapp Group