इंडिया आघाडीने नागपूरमध्ये होणारी सभा पुढे ढकलली, आता 'या' तारखेला होणार सभा
इंडिया आघाडीने नागपूरमध्ये होणारी सभा पुढे ढकलली, आता 'या' तारखेला होणार सभा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. NDA विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया आघाडी योजना आखत आहे. विरोधी आघाडी इंडियाची नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. 4 नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु राज्यात 5 ऑक्टोबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान असल्याने तारीख पुढं ढकलल्याची माहिती आहे. भाजप आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची मूठ बांधली आहे. इंडिया आघाडीच्या पहिल्या  जाहीर सभेची तारीख  पुढे ढकलली आहे. 

5 ऑक्टोबरला ग्रामपंचायत निवडणुका होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांनासभा पुढं ढकलण्याची विनंती केल्यामुळे वरिष्ठांनी निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने केंद्राविरुद्ध रणशिंग फुंकण्यासाठी इंडिया आघाडीकडून नागपूरला पसंती देण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरनंतर सभा होणार असून या सभेसाठी अनेक बडे नेते सहभागी होणार आहे. येत्या काळात जागावाटप आणि जाहीर सभांमधून इंडिया आघाडी एकजुट दाखवणार आहे.

NDA विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया आघाडी
पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. NDA विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया आघाडी योजना आखत आहे. एनडीएला घेरण्यासाठी विरोधी पक्षनेते एकजुटीने काम करत आहेत, विरोधकांची ही एकजूट संसदेच्या अधिवेशनातही दिसून आली. I.N.D.I.A. आघाडीने यापूर्वी पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत तीन बैठका घेतल्या आहेत. या आघाडीची शेवटची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली होती. मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी शक्य तितकं एकत्र लढण्याचा आणि जागांचा ताळमेळ बसवण्याचा संकल्प केला होता. आता निवडणुका जवळ आल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या विरोधात विविध ठिकाणी एकत्रित रॅली काढण्याचा विचार केला आहे. 

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये 'या' नेत्यांचा समावेश 
'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीत, ज्याला निवडणूक रणनीती समिती असंही संबोधलं जातं, तिच्या सदस्यांमध्ये काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, डीएमके नेते टीआर बालू, जेएमएम नेते हेमंत सोरेन, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत, आरजेडी नेते तेजस्वी यांचा समावेश आहे. यादव, आप नेते राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली खान, जेडीयू नेते लालन सिंह, सीपीआय नेते डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी आणि सीपीआय-एमचा एक सदस्य.

इतर बातम्या
Join Whatsapp Group