नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची हत्या
नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची हत्या
img
वैष्णवी सांगळे
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मद्यपी नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची घटना सिन्नर  तालुक्यातील निमगाव येथे घडली. नंदा किरण सानप (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून, पती किरण विष्णू सानप (वय ३८) याला नाशिकमधून अटक करण्यात आली.

निमगाव सिन्नरच्या टेकाडे वस्ती‌ शिवारात राहणारे दाम्पत्य किरण सानप आणि त्याची पत्नी नंदा सानप यांच्यात काही ना काही कारणावरून वाद होत असायचे.  मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास किरण याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, तिने ते देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले. राग अनावर झाल्याने त्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार केले. त्यानंतर तिथून तो पसार झाला. 

धक्कादायक ! बापाच्या हत्येचा घेतला 'असा' बदला, आरोपी अन् त्याच्या आईला...

छोटा मुलगा सार्थक घटनास्थळी आल्यानंतर त्याने आजूबाजूच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतील नंदाला उपचारांसाठी प्रारंभी सिन्नरला आणि त्यानंतर नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास उपचारांदरम्यान नंदाची प्राणज्योत मालवली. 

दरम्यान, शवविच्छेदनानंतर मयत महिलेचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. महिलेचे वडील बबन गोपाळा साबळे (६६, रा. दापूर, ता. सिन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण सानप याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू पाटील करत आहे.
Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group