डिसेंबर महिना उद्यापासून सुरु होणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये अर्ध्याहून अधिक दिवस बँका बंद राहणार आहेत. देशातील विविध भागात राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील.
आरबीआय बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये एकूण १७ बँक सुट्ट्या असतील. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्यात बँका तब्बल १७ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जर काही काम असेल तर सुट्ट्यांची ही लिस्ट चेक करुन जा.
आजकाल बँकांची अनेक कामे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने होतात. परंतु अनेकदा काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जावे लागते.
डिसेंबर महिन्यात १७ दिवसात बँदा बंद असणार आहेत. त्यात ५ रविवार असणार आहे.डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि इतर सणांच्या सुट्ट्यादेखील आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यातील बँकांची यादी जाहीर केली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार विविध राज्यांच्या सणानुसार सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी
- १ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी
- ३ डिसेंबर- सेंट फ्रांसिस जेवियर पर्व
- ८ डिसेंबर(रविवार)- साप्ताहिक सुट्टी
- १२ डिसेंबर (गुरुवार)- पा-तोगन नेगमिंजा संगमासाठी शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी
- १४ डिसेंबर (शनिवार)- महिन्यातील दुसरा शनिवार
- १५ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी
- १८ डिसेंबर- यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहणार
- १९ डिसेंबर- गोवा मुक्ती दिवस आहे त्यामुळे गोव्यात बँका बंद राहणार आहेत.
- २२ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी
- २४ डिसेंबर (मंगळवार)- ख्रिसमसच्या आदल्या दिवशी कोहिमा, आईजॉलमध्ये बँका बंद
- २५ डिसेंबर(बुधवार)- ख्रिसमसनिमित्त देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
- २६ डिसेंबर (गुरुवार)- ख्रिसमस उत्सवनिमित्त काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.
- २७ डिसेंबर(शनिवार)- चौथा शनिवार
- २८ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी
- ३० डिसेंबर - यू किआंग नांगबाहनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहणार आहे.
- ३१ डिसेंबर- न्यू ईयर निमित्त काही राज्यातील बँक बंद राहणार आहेत.