अजब बँकेची गजब कहाणी...  कर्ज वसुलीसाठी वाजविले भाजप नेत्याच्या दारात डफडे
अजब बँकेची गजब कहाणी... कर्ज वसुलीसाठी वाजविले भाजप नेत्याच्या दारात डफडे
img
Jayshri Rajesh
बीड जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली पथकाने केज येथील आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश राव आडसकर आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमराव मुंडे यांच्यासह बँकेच्या थकबाकीदारांच्या दारात जाऊन डफडे वाजून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. याची चर्चा जिल्ह्यात बीड होत आहे.

बँकेची अनोखी गांधीगिरी

 बीड जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक तथा जिल्ह्याधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशाने आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपचे नेते रमेश आडसकर तसेच माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विक्रमराव मुंडे यांच्यासह महसूल कर्मचारी पतसंस्था यांच्याकडे लाखो रुपयांचे कर्ज थकीत आहे.

 या कर्ज वसुलीसाठी बीड जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली पथकाने रमेशराव आडसकर आणि विक्रम मुंडे यांच्या केज येथील वकीलवाडी भागात असलेल्या निवासस्थानाच्या दारात डफडे वाजविले. यावेळी डी.सी. सी. बँकेचे जिल्हा व्यवस्थापक शरद ठोंबरे, उपव्यवस्थापक डी व्ही कुलकर्णी, उप व्यवस्थापक एस बी थोरात आणि सहाय्यक व्यवस्थापक एन एम रामटेके यांच्यासह बँक कर्मचारी हजर होते.

 बीड जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या कारवाईमुळे थकबाकीदार धास्तावले असून देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही भाजपच्याच नेत्यांच्या दारात डफडे वाजविल्याची चर्चा केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात होत आहे.
Bank |
इतर बातम्या
Join Whatsapp Group