नवीन वर्षात नवे आर्थिक नियम ! बँकिंग, पॅन - आधार लिंक अन्...
नवीन वर्षात नवे आर्थिक नियम ! बँकिंग, पॅन - आधार लिंक अन्...
img
वैष्णवी सांगळे
२०२६ या नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. नवीन वर्षात अर्थव्यवस्थेत देखील काही बदल होतात. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असतो. हे बदल बँकिंग, कर, रेल्वे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित असतात. जाणून घ्या हे बदल... 

1. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपला आहे. आता आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. तसेच महागाई भत्त्यातही वाढ होईल.

2. 1 जानेवारी 2026 पासून घरगुती एलपीजी, व्यवसायिक सिलिंडर आणि एटीएफच्या किमती सुधारित केल्या जाणार आहेत. यामुळे घरगुती बजेटवरही परिणाम होऊ शकतो.

3. एचडीएफसी बँकेने १० जानेवारी २०२६ पासून डेबिट कार्डधारकांसाठी मोफत एअरपोर्ट लाउंज ॲक्सेसच्या खर्चाच्या निकषांमध्ये बदल जाहीर केला आहे. नवीन प्रणालीत कार्डधारकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि सोयीसुविधा वाढवण्यासाठी व्हाउचर-आधारित प्रणालीचा वापर केला जाईल.

4. ICICI बँकेनं क्रेडिट कार्डच्या ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कांमध्ये बदल लागू करण्याची घोषणा केली आहे. हे बदल जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यादरम्यान लागू होतील.

5. क्रेडिट स्कोअर अपडेट व्हायची पद्धत आता बदलणार आहे. आपला क्रेडिट स्कोअर दर आठवड्याला अद्ययावत होईल. आपण जर वेळेवर EMI भरले तर, याचा फायदा आपल्याला होईल. पण एक दिवसही उशीर झाल्यास स्कोअरवर त्वरीत परिणाम होईल.

6. व्याज दरांबाबत एसबीआय, एचडीएफसी आणि पिएनबी यांसारख्या मोठ्या बँका नवीन निर्णय घेऊ शकतात. तसेच एफडी दर आणि कर्जावरील व्याजदरांमध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

7. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025पर्यंत होती. आधार - पॅन लिंक करण्याच्या प्रक्रियेची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 असेल, असे सरकारने स्पष्ट केले होते. या तारखेपर्यंत लिंक न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय मानले जाईल. यामुळे बँकांशी संबंधित कामे रखडू शकतात. तसेच आयटिआर फाईल प्रक्रिया करतानाही अडचण येऊ शकते. इतर आर्थिक व्यवहारांवरही परिणाम होऊ शकतो.

8. जानेवारीत नवीन आयकर रिटर्न फॉर्म मिळण्याची शक्यता आहे. हा फॉर्म बँकिंग व्यवहार आणि खर्चाच्या माहितीने आधीच भरलेला असेल. यामुळे तपासणी वाढेल आणि त्रुटींची शक्यता कमी होईल.

9. रेल्वे बोर्डाने आगाऊ आरक्षणाच्या पहिल्या दिवशी आधार प्रमाणित बुकिंगसाठीची विशेष वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ५ जानेवारी २०२६ पासून आधार-प्रमाणित वापरकर्ते पहिल्या दिवशी सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० या वेळेत सामान्य आरक्षित ट्रेनची तिकिटे ऑनलाइन बुक करू शकतील.

10. 10 जानेवारी 2026 पासून डेबिट कार्ड धारकांसाठी मोफत एअरपोर्ट लाउंज अॅक्सेसच्या खर्चाच्या निकषांमध्ये बदल जाहीर केलाय. नवीन प्रणालीत कार्डधारकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच सोयीसुविधा वाढवण्यासाठी व्हाउचर आधारित प्रणालीचा वापर केला जाईल.


Bank |
इतर बातम्या
Join Whatsapp Group