महत्वाची बातमी :
महत्वाची बातमी : "या" आठवड्यात "इतक्या" दिवस बँका बंद राहणार
img
Dipali Ghadwaje
तुमचं जर बँकेत काही महत्वाचं काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. डिसेंबर महिना संपायला अवघे सात दिवस उरले आहेत. त्यामुळे तुमचे बँकेशी निगडित काही काम राहिले असेल तर तुम्हाला ते त्वरित करावे लागणार आहे. कारण या आठवड्यात तब्ब्ल तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुट्ट्या पाहून बँकेच्या कामाचं नियोजन करायला हवं.

तीन दिवस बँका बंद राहणार :

या आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस निमित्ताने देशभरातील बँका देखील बंद राहणार आहेत. याशिवाय 28 डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 डिसेंबर रोजी रविवार असल्याने या दोन दिवशी बँका बंद राहणार आहेत.

मात्र या आठवड्यात तीन दिवस बँका बंद असल्या तरी देखील तुम्ही ऑनलाईन स्वरूपाने बँकेची कामे करू शकता. त्यामुळे तुम्ही पैसे ट्रान्सफर करणं, बिल भरणं, रिचार्ज करणं, पैसे गुंतवण्यासारख्या गोष्टी बँकेच्या अधिकृत अॅपच्या मदतीनं करू शकता.
Bank |
इतर बातम्या
Join Whatsapp Group