SBIच्या  ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेच्या 'या' निर्णयामुळे कोट्यवधी लोकांना फटका बसणार
SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेच्या 'या' निर्णयामुळे कोट्यवधी लोकांना फटका बसणार
img
Dipali Ghadwaje
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत कोट्यवधी लोकांची खाती आहे. या सर्व ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.

स्टेट बँकेने त्यांच्या अल्प आणि दीर्घ अशा सर्व मुदतीच्या एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांना कमी व्याज मिळणार आहे.  

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व एफडी योजनांवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने आणि बचत खात्यांवरील व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. यामुळे आता यापुढे ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहे. हे नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत.

आरबीआयच्या निर्णयानंतर व्याजदरात कपात

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांनी त्यांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांनी व्याजदर कमी केले होते. त्यांतर आता एसबीआयनेही व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआयचे एफडीवरील नवीन व्याजदर

एसबीआयने सर्व नियमित एफडी कालावधींवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) ने कमी केला आहे. या कपातीनंतर आता बँक सामान्य नागरिकांना एफडीवर कमीत कमी 3.05 % आणि जास्तीत जास्त 6.45% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक कमीत कमी 3.55 % आणि जास्तीत जास्त 7.05 % व्याज देत आहे. हे नवीन दर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

बचत खात्यावरील नवीन व्याजदर

स्टेट बँकेने बचत खात्याचा व्याजदर वार्षिक 2.5 % केला आहे. हा नवीन दर 15 जून 2025 पासून लागू आहे. यापूर्वी बँक 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.7 % आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 3% व्याज देत होती, मात्र आता त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
Bank | SBI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group