रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निधी काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींमधून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल.
बँकेवर कोणते निर्बंध लादण्यात आले आहेत?
बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध 23 एप्रिल 2024 (मंगळवार) रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून लागू झाले. लादलेल्या निर्बंधांमुळे बँक कोणतेही कर्ज मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व हस्तांतरित करू शकत नाही किंवा आरबीआयच्या परवानगीशिवाय त्यांच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही.