1 जानेवारीपासून 'ही' बँक खाती होणार बंद ; RBI चा मोठा निर्णय
1 जानेवारीपासून 'ही' बँक खाती होणार बंद ; RBI चा मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
नवीन वर्ष २०२५ पासून भारतीय रिझर्व्ह बँक बँकींग सिस्टीममध्ये नवीन बदल करण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर पडू शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे.आरबीआयच्या निर्देशानुसार नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार आहेत.  

आरबीआयने फसवणूकीच्या प्रकारांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बँकींग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी, डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारीचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यात ज्या बँक खात्यात गेल्या १२ महिन्यात कोणताही व्यवहार झालेला नाही , म्हणजे बँक खात्यात १२ महिन्यांपासून जी खाती बंद आहेत ती बँक खाती बंद केली जाणार आहेत.

इनएक्टीव्ह अकाऊंट

जी बँक खाती गेल्या १२ महिन्यांपासून कोणतेही ट्राझक्शन झालेले त्या खात्यांनी इनएक्टीव्ह कॅटगरीत टाकले जाणार आहे. जर कोणत्या खातेधारकाने एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ आपल्या बँक खात्यात कोणताही व्यवहार केलेला नाही तर अशा स्थिती या खात्यांना इनएक्टीव्ह कॅटगरीत टाकत बंद केले जाणार आहे. तुम्ही हवे तर नंतर बँकेशी संपर्क करुन आपले खाते पुन्हा एक्टीव्ह करु शकता. 

झिरो बॅलन्स खाते

ज्या बँक खात्यात खूप काळापासून शून्य बॅलन्स आहेत त्या खात्यांना देखील १ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. अशा खात्यांचा दुरुपयोग टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाचा हेतू ग्राहकांना आपल्या खात्याचा वारंवार वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा देखील आहे. जर तुमच्या खाते बराच काळ शून्य बॅलन्स आहे तर तुम्ही लागलीच तुमच्या नजीकच्या शाखेत जाऊन केवायसी करुन घ्यावे.

डोरमेट खाते

हे एक असे खाते आहे. ज्या दोन किंवा अधिक वर्षांपासून कोणतेही ट्राझक्शन झालेले नाही. अशी खाती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर असतात. अशी खाती हॅक केली जातात. आणि त्याचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जातो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group