घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त ; समोर आली
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त ; समोर आली "ही" माहिती
img
Dipali Ghadwaje
सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. आगामी काळात स्वतःचं घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. रिझर्व्ह बँकेकडून दोन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली गेली आहे. येणाऱ्या काळातही रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


मागील वेळी आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर अनेक सरकारी बँकांनी कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात केली होती.

त्यामुळे अनेक बँकांच्या गृहकर्जावरील व्याजदर ८ टक्क्यांहून कमी झाले आहे. मागील चार वर्षांत पहिल्यांदाच कर्जावरील व्याजदर आठ टक्क्यांहून कमी झाले आहे. आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , येणाऱ्या जूनपासून दिवाळीपर्यंत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये ०.५० टक्के ते ०.७५ टक्क्यांपर्यंत कपात केली जाईल अशी अपेक्षा बँकिंग क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

पुढील महिन्यात म्हणजेच ४ ते ६ जून या कालावधीत आरबीआयची पतधोरण आढावा बैठक आहे. त्यानंतर ५ ते ७ ऑगस्ट किंवा २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत आरबीआयची आढावा बैठक आहे. त्यामुळे आगामी काळात रेपो रेटमध्ये मोठी कपात केली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group