नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शेवटच्या पतधोरणात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वाढत्या महागाईपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे.
सध्या ही मर्यादा 1.6 लाख रुपये असणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले.
रिझर्व बँकेने शेतकऱ्यांना एक भेट दिली असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवली आहे. रिझर्व बँकेच्या धोरणानुसार सध्या शेतकऱ्यांसाठी तारण मुक्त कर्जाची मर्यादा सध्याच्या 1.6 लाख रूपये आहे. ही मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा लहान व मध्यम शेतकऱ्यांना होणार आहे.
या घोषणेचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण घ्यावे लागणार नाही. पूर्वी ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती, म्हणजेच कोणतेही तारण न देता, शेतकरी केवळ 1.60 लाख रुपयांपर्यंतच कर्ज घेऊ शकत होते, ज्याची मर्यादा आता 2 लाख रुपये झाली आहे.