रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १ एप्रिलला २००० रुपयांची नोट
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १ एप्रिलला २००० रुपयांची नोट
img
DB
तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मागच्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अनेकांनी २००० रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा केल्या जातील असा आदेशही देण्यात आला.

नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी आरबीआयची मुदत होती. परंतु, दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही पूर्णपणे प्रणालीत आलेल्या नाहीत. आरबीआय सध्या दोन हजारांची नोट जमा करण्याची संधी देत आहे. तसेच पोस्टाने देखील २००० रुपयांची नोट जमा करता येते.
 
सध्या आरबीआयने २००० रुपयांच्या नोटांबाबत प्रसिद्धीपत्रक जमा केले आहे. या परिपत्रकानुसार १ एप्रिलला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात २ हजार रुपयांच्या नोटा जमा होणार नाही.
 
1. का बदलता येणार नाही २००० ची नोट

सामान्य लोकांना १ एप्रिलला २ हजारांची नोट बदलता येणार नाही. याचे कारण असे की, वार्षिक अकाउंटिंगशी संबंधित कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बँक कामामुळे बंद असल्यामुळे पैसे जमा करता येणार नाही.

2. २००० च्या नोटा कधीपासून बदलणार

तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही २ एप्रिलपासून त्या बदलू शकता. ही नोट बदलण्याची सेवा २ एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहे.

 3. १ एप्रिलला बँक का बंद?

आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे मागील वर्षातील काही गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. त्यासाठी १ एप्रिलला बँका सर्वसामान्यांसाठी बंद राहातील. तसेच सध्या लाँग वीकेंड असल्यामुळे पुढील ४ दिवस बँका बंद राहातील.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group