आरबीआयचा पाच बँकांना 50 लाखांचा दंड, 'या' कारणांमुळे केली कारवाई
आरबीआयचा पाच बँकांना 50 लाखांचा दंड, 'या' कारणांमुळे केली कारवाई
img
दैनिक भ्रमर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते आणि बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करते. गुरुवारी १८ जानेवारी २०२४ रोजी सेंट्रल बँकेने पाच सहकारी बँकांवर कारवाई करून लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

दरम्यान ज्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली, त्यात एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरिक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरिक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे.

या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही. तसेच ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली गेली होती. तपासणीनंतर RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधानी न झाल्यामुळे RBI ने NKGSB सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

‘या’ कारणास्तव इतर बँकांना दंड ठोठावण्यात आला
रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने दान केलेल्या पैशात नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली.

आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम नीट पाळले नाहीत. याशिवाय कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरिक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरिक सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group