मुंबई : फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसांपैकी शनिवार रविवार पकडून 13 दिवस बँक बंद राहणार आहे. ह्या सुट्ट्या प्रत्येक राज्यांनुसार वेगवेगळ्या आहेत. आता बजेटमध्ये बँकेच्या कामाच्या तासांबद्दल महत्त्वाची घोषणा होऊ शकते.
बँक कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुट्टी द्यावी आणि 5 दिवसांचा आठवडा करावा ही मागणी कर्मचारी मागच्या काही वर्षांपासून करत होते. आता यावर बजेटमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
सध्या बँक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहते. बँक कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बँका आठवड्यातून फक्त पाच दिवस सुरू राहतील.
देशातील करोडो बँक ग्राहकांसाठी बँक शाखा उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ बदलणार आहे, कामाचे तास वाढतील आणि पाच दिवसांचा आठवडा केला जाऊ शकतो. अर्थसंकल्पातील या महत्त्वाच्या निर्णयाला सरकार मान्यता देते की नाही, हे 1 फेब्रुवारीला कळणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.