फेब्रुवारी महिना सुरू होण्यास फक्त एक दिवस उरला आहे. 1 फेब्रुवारीपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. कोणकोणते नियम बदलणार आहेत, जाणून घ्या.
1. एलपीजी सिलेंडरचे दर बदलण्याची शक्यता
एलपीजीच्या नवीन किंमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जाहीर केल्या जातात. आता सरकार 1 फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होते की नाही ते पाहावं लागेल. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.
2. IMPS नियम बदलणार
1 फेब्रुवारीपासून IMPS (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. आता तुम्ही 1 पासून लाभार्थीचे नाव न जोडता थेट बँक खात्यांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने 31 ऑक्टोबर 2023 रोजी हे परिपत्रक जारी केले होते. बँक खात्यातील व्यवहार जलद आणि अधिक अचूक करण्यासाठी NPCI ने IMPS चे नियम बदलले आहेत. NPCI नुसार, तुम्ही फक्त फोन नंबर आणि प्राप्तकर्त्याचे किंवा लाभार्थीचे बँक खाते नाव टाकून पैसे पाठवू शकता.
3. KYC लिंक नसलेले फास्टॅग निष्क्रिय
केवायसी नसलेले फास्टॅग 31 जानेवारीनंतर बँकांद्वारे निष्क्रिय किंवा काळ्या यादीत टाकले जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका वाहनाला अनेक फास्टॅग जारी केल्याच्या आणि KYC शिवाय फास्टॅग जारी केल्याच्या अलीकडील अहवालानंतर NHAI ने हे पाऊल उचलले आहे. जर तुमच्याकडे तुमच्या फास्टॅगसाठी KYC नसेल तर ते 31 तारखेपर्यंत पूर्ण करा अन्यथा ते 1 फेब्रुवारी 2024 पासून निष्क्रिय होईल.
4. SGB चा नवीन हप्ता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2023-24 या आर्थिक वर्षातील सॉव्हरिन गोल्ड बाँडचा शेवटचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करेल. SGB 2023-24 चौथी मालिका 12 फेब्रुवारी रोजी उघडेल आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल. तर मागील हप्ता 18 डिसेंबर रोजी उघडला आणि 22 डिसेंबर रोजी बंद झाला. या हप्त्यासाठी सेंट्रल बँकेने सोन्याची इश्यू किंमत 6,199 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली होती.
5. SBI होम लोन ऑफर
स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे एक विशेष गृह कर्ज मोहीम चालवली जात आहे, ज्या अंतर्गत बँकेचे ग्राहक गृहकर्जावर 65 bps पर्यंत सूट घेऊ शकतात. प्रक्रिया शुल्क आणि गृहकर्जावर सवलत देण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे. ही सूट सर्व गृहकर्जांसाठी वैध आहे. हा लाभ 1 फेब्रुवारीपासून संपणार आहे.
6. पंजाब आणि सिंध बँक स्पेशल एफडी
पंजाब आणि सिंध बँक चे ग्राहक 31 जानेवारी 2024 पर्यंत 'धन लक्ष्मी 444 दिवस' FD च्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. देशांतर्गत मुदत ठेव खाते उघडण्यासाठी पात्र असलेले सर्व निवासी भारतीय NRO/NRE ठेव खातेधारक PSB धन लक्ष्मी नावाची ही विशेष FD योजना उघडण्यासाठी अर्ज करू शकतात.
7. NPS मधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलणार
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ने 12 जानेवारी 2024 रोजी पेन्शनची आंशिक पैसे काढण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्याची हमी देण्यासाठी एक मास्टर परिपत्रक जारी केले होते. हे 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू होईल. NPS खातेधारक त्यांच्या वैयक्तिक पेन्शन खात्यातील योगदानाच्या 25% पर्यंत काढू शकतात (नियोक्ता योगदान वगळता). यामध्ये खातेदार आणि नियोक्ता दोघांच्याही योगदानाच्या रकमेचा समावेश असेल. यानुसार, जर तुमच्या नावावर आधीच घर असेल तर त्यासाठी NPS खात्यातून आंशिक पैसे काढता येणार नाहीत.