नोएडा शहरात एक आश्चर्यदायक घटना घडली आहे. शहरातील एका तरुणाच्या दिवंगत आईच्या बँक खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली. ही रक्कम एवढी मोठी आहे की हे पाहून बँक अधिकारीच नव्हे, तर सामान्य नागरिकही आश्चर्यचकित झाले. तरुणाच्या आईच्या नावे असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात 37 अंकी रक्कम जमा झाली. ही रक्कम 1,00,13,56,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 रुपये म्हणजेच जवळपास एक अब्ज 13 लाख 56 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त) इतकी आहे.
गायत्री देवी यांचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले. 3 ऑगस्टला अकाऊण्ट चेक करत असताना त्यांचा मुलगा दीपक ( २० वर्ष ) याला 1 अब्ज 13 लाख कोटी रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. यानंतर त्याने बँकेशी संपर्क साधला. बँकेने तातडीने इन्कम टॅक्स विभागाला कळवलं आणि बँक खात्याची चौकशी सुरु केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास केल्यावर समजलं, की तांत्रिक चुकांमुळे हे घडले आहे. बँकेने तरुणाचे अकाऊण्ट फ्रीज केले आहे. तसेच आयकर विभागाला याबद्दल माहिती दिली आहे. आता या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.