रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कारवाईचा धडाका सुरूच ठेवत नामांकित खासगी बँकेला दणका दिला आहे. कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयने ही मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेवरील कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयनं सांगितलं आहे.
कारवाईचे कारण काय ?
आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेवरील कारवाईबाबत माहिती देताना म्हटलं की ॲक्सेस टू बँकिंग सर्व्हिसेस- बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट , बिझनेस कॉरस्पॉन्डंटस संबंधित नियमांशिवाय क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज रुल 2006 चं पालन करण्यात बँक कमी पडल्याचं समोर आलं आहे. यामुळं बँकेला 11 डिसेंबरच्या आदेशानं 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी 31 मार्च 2024 ला आरबीआयकडून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत वैधानिक पर्यवेक्षण आणि मूल्यांकन करण्यात आलं होतं. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेनं बीएसबीडी अकाँऊट अशा खातेदारांची उघडली ज्यांच्याकडे पहिल्यापासून बँक खाती होती हे आरबीआयच्या निदर्शनास आलं. याशिवाय बँकेनं निश्चित मर्यादेबाहेर जाऊन काही कामांसाठी बिझनेस कॉरस्पाँडटस् सोबत करार केले होते. याशिवाय बँकेनं काही कर्जदारांबाबतची चुकीच्या पद्धतीनं क्रेडिट इन्फॉरमेशन कंपन्यांना दिली होती.