सध्या शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. जागतिक परिस्थिती आणि भातातील स्थिती समजून घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला जातोय.
भारतीय शेअर बाजरात अलीकडेच प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. उच्चांकावर झेप घेतलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात आता मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसत असून गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा आला आहे. देशांतर्गत शेअर बाजारात झालेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना आणखी एका पडझडीला सामोरे जावे लागले असून बुधवारी सलग पाचव्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.
दरम्यान या आठवड्यात 15 नोव्हेंबरपासून शेअर बजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या राहणार आहेत. या सुट्ट्या नेमक्या कशामुळे आहेत? या काळात शेअर बाजार बंद का असेल? हे जाणून घेऊ या...
15 नोव्हेंबर रोजी देशभरातील बँका तसेच शेअर बाजार बंद असणार आहे. म्हणजेच आता बँका आणि शेअर बाजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत. गुरु नानक जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी ही सुट्टी असेल.
कोणकोणत्या शहरात, राज्यांत बँका बंद असतील?
महाराष्ट्र, मिझोरम, मध्य प्रदेश, ओडिसा, उत्तर प्रदेश, चंदिगड, नागालँड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हैदराबाद, जम्मू, तेलंगाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, श्रीनगर या भागात 15 नोव्हेंबर रोजी बँका बंद असतील. त्यामुळे बँकिंग क्षेत्राशी निगडित काही काम असेल तर नागरिकांना 16 नोव्हेंबर रोज करता येईल.
शेअर बाजारात लाँग विकएंड
शेअर बाजारात मात्र यावेळी लाँग विकएंड आला आहे. कारण 15 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर शेअर बाजार प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी बंद असतो. म्हणजेच 16, 17 आणि 17 नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस भारतातील शेअर बाजार बंद असेल. म्हणजेच ट्रेडर्स, ब्रोकर्सना आता सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
रिझर्व्ह बँकेने याआधीच केली आहे घोषणा
रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी बँकांना कोणत्या दिवशी सुट्ट्या असतील, याबाबत सांगण्यासाठी एक यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत 15 नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी असेल, असे नमूद आहे.
पुढच्या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी बँका बंद
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2020 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रातील बँका तसेच शेअर बाजाराला सुट्टी असेल.