नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकांना राहणार 15 दिवस सुटया ? जाणून घ्या संपूर्ण हॉलिडे लिस्ट
नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकांना राहणार 15 दिवस सुटया ? जाणून घ्या संपूर्ण हॉलिडे लिस्ट
img
दैनिक भ्रमर
नववर्षच्या स्वागताच्या तयारीसोबतच जर तुम्ही नवीन वर्षात जर तुम्हाला बँकेची काही कामे करायची असतील तर ही  बातमी तुमच्यासाठीचआहे. कारण येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात बँकांना १५ दिवस सुट्ट्या असणार आहेत. आरबीआय प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्या जाहीर करते. काही सुट्ट्या या स्थानिक, राज्य पातळीवर असतात, उर्वरित सुट्ट्या या राष्ट्रीय पातळीवर असतात. जाणून घेऊया हॉलिडे लिस्ट. 

जानेवारी महिन्यात बँकांना एकूण 15 दिवस सुट्टी असेल. यामध्ये प्रत्येक आठवड्यातील दुसरा आणि चौथा शनिवार तसेच साप्ताहिक सुट्टी रविवारचा समावेश आहे. जानेवारीच्या सुरुवातीला काही बँकांमध्ये १ जानेवारीला सुट्टी देऊन नवीन वर्ष आणि नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे.

जानेवारी 2025 च्या बँक सुट्ट्यांची यादी

1 जानेवारी: नवीन वर्षाचा दिवस
2 जानेवारी: नवीन वर्ष आणि मन्नम जयंती
5 जानेवारी : रविवार
६ जानेवारी: गुरु गोविंद सिंग जयंती
11 जानेवारी: दुसरा शनिवार
12 जानेवारी: रविवार आणि स्वामी विवेकानंद जयंती
14 जानेवारी: मकर संक्रांती आणि पोंगल
15 जानेवारी: तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि मकर संक्रांती
16 जानेवारी: उज्जावर तिरुनाल
19 जानेवारी: रविवार
23 जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
25 जानेवारी: चौथा शनिवार
२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी : सोनम लोसार
22 जानेवारी: Imoine

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अद्याप 2025 च्या अधिकृत बँक सुट्ट्यांची घोषणा केली नसली तरी, या सुट्ट्यांव्यतिरिक्त तुम्ही कामाचं नियोजन करू शकता. जानेवारी 2025 मध्ये भारतातील विविध भागात हे प्रमुख सण साजरे केले जातील. तुमच्या जवळच्या बँक कार्यालयात या सुट्ट्यांची खात्री करा आणि त्यानुसार तुमचे काम व्यवस्थापित करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group