केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जीएसटी दरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आता जीएसटीचे फक्त दोन टॅक्स स्लॅब आहेत. दरम्यान, जीएसटी कमातीनंतर आता आरबीआय अजून एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता जीएसटी कपातीनंतर ईएमआयचा भारदेखील कमी होणार आहे. आरबीआय फ्लोटिंग रेट कर्जाचा ईएमआय कमी करणार आहे.

आता फ्लोटिंग व्याजदराने कर्ज घेतल्यास तुम्हाला नवीन सुविधा मिळणार आहे. बँका ३ वर्षांच्या लॉक इनपूर्वीही ईएमआय कमी करु शकतील. याचा फायदा थेट कर्जदारांना होणार आहे. हा निर्णय घेतल्यावर हप्ता कमी होणार आहे. आता आरबीआयच्या या निर्णयाचा फिक्स्ड रेट कर्जदारांनादेखील फायदा होणार आहे. आता एफडीधारकांना हा पर्याय निवडता येणार आहे.
निश्चित व्याजदराचे कर्ज घेतल्यावर तुम्हाला फ्लोटिंग दरात स्विच करण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे कर्जदारांना त्यांच्या इच्छेनुसार किंवा बाजारानुसार योग्य व्याजदर निवडण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ते त्यांना वाटेल तेव्हा फ्लोटिंग कर्जात स्विच करु शकतात.
फ्लोटिंग व्याजदर म्हणजे ज्याचे व्याजदर सतत बदलत असते. कर्जाच्या कालावधीत हे व्याजदर कधीही बदलू शकते. हे व्याजदर बाजारातील चढ-उतारांवर आणि बेंचमार्क दरांवर अवलंबून असतो.हा दर फिक्स्ड व्याजदराच्या उलटा असतो. हा व्याजदर होम लोन, बॉण्ड्स आणि इतर कर्जांमध्येही उपलब्ध असतो. बाजारात दर कमी असताना फ्लोटिंग दरावर कर्ज घेणे फायदेशीर ठरते.